
शिंदे सरकारचा महत्वाचा निर्णय... बांगलादेशात अडकलेल्या राज्यातील नागरिकांना विशेष विमानाने आणणार
Pointers by Pooja Shinde 08-Aug-2024
- बांगलादेशातील अस्थिर परिस्थितीमुळं तसंच हिंसाचाराच्या घटनांमध्ये भारतातील अनेक नागरिक बांगलादेशात अडकून पडले आहेत. बांगलादेशात अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची तसंच अभियंत्यांची यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याकडं दिली आहे.
- बांगलादेशात सुरू असलेल्या अराजक परिस्थितीत अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि अभियंत्यांना तातडीने परत आणण्यासाठी विशेष विमाने उपलब्ध करून दिली जातील.
- केंद्रीय परराष्ट्र मंत्र्यांनी संबंधित विद्यार्थी आणि नागरिकांशी संपर्क साधून त्यांना तातडीने मदत उपलब्ध करून दिली जाईल असं आश्वासन दिलं आहे. या संदर्भात समन्वय साधण्यासाठी राज्य सरकारनं एक पथकही नियुक्त केलं आहे.
- बांगलादेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून योग्य ती मदत आणि सहकार्य केलं जाईल. बाधितांना तातडीनं राज्यात परत आणण्यासाठी राज्य सरकारमार्फत सर्व मदत आणि उपाययोजना केल्या जातील, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
- बांगलादेशात असलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची यादी संकलित करून परराष्ट्र मंत्रालयाला उपलब्ध करून देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांशी त्वरित संपर्क साधण्यासाठी, विद्यार्थ्यांना मदत उपलब्ध करून देण्यासाठी, तेथील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि प्रभावित कुटुंबांशी संपर्क ठेवण्यासाठी राज्य शासनामार्फत एक पथकही स्थापन करण्यात आल्याचं सांगण्यात आलय.

गणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी! गावी जाणाऱ्या भक्तांना यंदाही टोल माफी, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय
Pointers by Pooja Shinde 14-Aug-2024
- गणेशोत्सवापूर्वी गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत त्यासाठी रॅपीड क्वीक सेटिंग हार्डनर-एम सिक्टी या आधुनिक साहित्याचा वापर करावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
- गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोलमाफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासंबधीचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे.
- गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला आहे. तसेच गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्याचे असे आदेश दिले आहेत.
- राज्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा. गणेशोत्सवापूर्वी गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवावेत त्यासाठी रॅपीड क्वीक सेटिंग हार्डनर-एम सिक्टी या आधुनिक साहित्याचा वापर करावा. झाडांच्या फांद्याची छाटणी करावी. कृत्रिम तलावांची संख्या वाढवावी. मोठ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या ठिकाणी आरोग्य पथक, रुग्णवाहिका, अग्निशमन वाहन तैनात करावेत असे निर्देश देऊन गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या गणेश भक्तांना यंदाही टोल माफीचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला.
- राज्यातील सर्वच मोठ्या शहरांमध्ये गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी रॅपीड क्वीक सेटिंग हार्डनर-एम सिक्टी या आधुनिक साहित्याचा वापर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी महापालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांना दिले. मोठ्या सार्वजनिक गणेश मंडळांच्या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होते. अशा ठिकाणी आरोग्य पथक, रुग्णवाहिका, अग्नीशमन वाहन तैनात करावे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा पैसे जमा होण्यास सुरवात, मुख्यमंत्र्यांची माहिती
Pointers by Pooja Shinde 14-Aug-2024
- राज्य सरकारची सर्वात मोठी आणि महत्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास आजपासूनच सुरुवात झाली आहे.
- राज्य सरकारे 17 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचे 3000 रुपये एकाच दिवशी जमा होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, आजपासूनच ही रक्कम लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
- बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रत्यक्षात लाभ मिळायला सुरुवात झाली आहे. 3-4 दिवसांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधनचे पवित्र औचित्य साधून स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळायला सुरुवात झाली आहे.
- मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना चालू होऊन एक महिनाही झालेला नाही. राज्यात 1 कोटी 40 लाख महिलांची नोंदणी पूर्ण झाली आहे. शासन-प्रशासनाच्या मेहनतीमुळं हे शक्य झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.
- ज्या महिला भगिनींना या दोन महिन्यांचा लाभ मिळाला नाही, त्यांना सप्टेंबर महिन्यात एकूण 3 महिन्यांचा थेट लाभ मिळणार असून 4500 रुपये त्यांच्या बँक अकाऊंटवर जमा होतील, असेही मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं आहे.

कापूस सोयाबीनच्या अर्थसहाय्याबाबत कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा, प्रतिहेक्टरी 5 हजारांचं अनुदान, कोण असेल लाभार्थी?
Pointers by Pooja Shinde 11-Aug-2024
- मागील वर्षी सरासरीहून कमी पाऊस झाल्याने तसेच पिकांवर रोग पडल्याने खरीप हंगामात राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते त्या साठी अर्थसाह्य करण्यात येत आहे.
- राज्यातील कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांच्या अर्थसहाय्याबाबत कृषीमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. मागील वर्षी झालेल्या खरीपातील नुकसान भरून काढण्यासाठी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५ हजार रुपये अनुदान देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
- शासनाचा निर्णयही प्रसिद्ध करण्यात आला असून ई-पीक पेरा केलेले सर्व कापूस व सोयाबीन शेतकरी या अर्थसहाय्यासाठी पात्र राहणार आहेत.
- कोणते शेतकरी राहणार पात्र?- ही रक्कम सोयाबीन-कापूस उत्पादक असलेल्या व ज्यांनी ई-पीक पेऱ्यांची नोंदणी केलेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. शेतकऱ्यांचे आधार व बँक खाते संलग्न असलेली माहिती, कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या खात्यांवर रक्कम वर्ग करण्यासाठी वापरावी. यासाठी शेतकऱ्यांनी वैयक्तिक संमतीपत्र किंवा सामूहिक शेती असल्यास सामूहिक नाहरकत प्रमाणपत्र तातडीने सादर करणे आवश्यक राहील.
- नुकसानभरपाईसाठी किती निधी प्रस्तावित?- 2023 च्या खरीप हंगामात झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानाबाबत सरकारने हा निर्णय घेतला असून दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन असणाऱ्यांना प्रती हेक्टर 1000 रुपये तर त्याहून अधिक जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना 5000 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे अर्थसहाय्य करण्यात येणार आहे

हिंडनबर्ग'नं अदानी समूहानंतर SEBI च्या अध्यक्ष रडारवर, नव्या रिपोर्टमध्ये काय आहे? जाणून घ्या
Pointers by Pooja Shinde 11-Aug-2024
- अदानी समूहाविरोधात अहवाल प्रसिद्ध करणाऱ्या हिंडनबर्ग रिसर्चने आता शेअर बाजाराचं नियमन करणाऱ्या ‘सेबी’च्या अध्यक्षा माधबी बुच यांच्यावर आरोप केले आहेत. सेबी म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया होय.
- ‘हिंडनबर्ग’ने व्हिसलब्लोअर कागदपत्रांचा संदर्भ देत म्हटलंय की, सेबीच्या अध्यक्षा माधबी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांची अदानी समूहाच्या आर्थिक अनियमिततेशी संबंधित असलेल्या ऑफशोअर कंपन्यांमध्ये भागिदारी आहे
- सेबीच्या अध्यक्षांच्या या हितसंबंधांमुळे बाजार नियामकाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचं ‘हिंडनबर्ग’नं म्हटलं आहे. सेबीच्या नेतृत्वाबाबत या रिपोर्टमध्ये चिंता व्यक्त केली गेलीय.
- माधबी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांनी म्हटलंय की, "आमच्यावर लावण्यात आलेले आरोप निराधार असून, ते आम्ही फेटाळत आहोत. आमचं आयुष्य आणि आर्थिक व्यवहार एका खुल्या पुस्तकासारखे आहेत. गेल्या काही वर्षात सेबीला सर्व आवश्यक माहिती दिली गेलीय.
- काँग्रेसने हिंडनबर्ग रिसर्चच्या या नव्या रिपोर्टवर म्हटलंय की, अदानी मेगा स्कॅमच्या व्याप्तीच्या चौकशीसाठी एक संयुक्त संसदीय समिती (JPC) ची स्थापना करण्यात यावी.

मिसेस उपमुख्यमंत्री अमृता फडणवीस यांचे नवं गाणं चर्चेत, होत आहे प्रचंड व्हायरल
Pointers by Pooja Shinde 09-Aug-2024
- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यांनी स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्या एक उत्तम गायिकाही आहेत.
- आजवर त्यांनी अनेक गाण्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. त्यांची सगळीच गाणी चर्चेत येतात. आता नवीन गाणं घेऊन त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. अमृता यांच्या इतर गाण्यांप्रमाणेच हे गाणंही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या गाण्याला चाहत्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
- अमृता यांचं 'सावन' हे नवीन गाणं प्रदर्शित झालं आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट शेअर करत त्यांनी चाहत्यांना ही माहिती दिली आहे. 'इस बार तेरे शहर में , जो सावन आया है, उसे मेरी आँखों ने…बरसना सिखाया हैं, असे गाण्याचे बोल आहेत.
- 'सावन' हे गाणं रजत नागपाल, केशव त्योहार यांनी संगीतबद्ध केलं आहे. तर गीतकार राणा सोटलने लिहिलं असून अमृता फडणवीसांच्या आवाजात ते रेकॉर्ड करण्यात आलं आहे.
- अमृता फडणवीस या बँकर आहेत. मात्र,गायनाची प्रचंड आवड असल्यानं त्यांचे अनेक म्युझिक व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. अमृता फडणवीस यांनी यापूर्वी अनेक भक्तीपर गीते गायली आहेत. त्यांचं 'सारे जहाँ से अच्छा' हे देशभक्तीपर गाणंदेखील प्रेक्षकांच्या भेटीस आलं होतं.हे देशभक्तीपर गाणंदेखील प्रेक्षकांच्या भेटीस आलं होतं.